चिनी सैनिक जिवाच्या आकांताने पळत होते; भारतीय जवानांनी पाठलाग करुन...

अरुणाचल प्रदेश: अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी चकमक झाली. सुरुवातीला यामध्ये दोन्ही बाजूचे ३० सैनिक जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आज संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैनिक किरकोळ जखमी झाल्याचं स्पष्ट केलं आहे.९ डिसेंबर रोजी घडलेली ही घटना काल १२ डिसेंबर रोजी उघड झाली. त्यानंतर त्या घटनेशी संबंधीत एकेक मुद्दे समोर आलेले आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहाबाहेर भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं.



संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सांगितलं की, चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या तळावर हल्ला केला होता. आपल्या जवानांनी तात्काळ त्यांच्या सैनिकांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना पळवून-पळवून माघारी धाडलं.मीडिया रिपोर्ट्नुसार भारतीय सैनिकांच्या जोरदार प्रतुत्तरापुढे चिनी सैनिकांना जीव वाचवून पळावं लागलं आहे. भारतीय सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याने तर चिनी सैनिकांची भंबेरी उडाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने