‘बिग बॉस’मधून राखी सावंतचा पत्ता होणार कट? घरातली भांडी फोडल्याने अभिनेत्रीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई:  ‘बिग बॉस मराठी’च्या चौथं पर्व सध्या रंजक वळणावर आहे. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद, मतभेद सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या वाद मतभेदांमध्ये चर्चेचा विषय ठरते ती राखी सावंत. काही दिवसांपूर्वीच राखी चे बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तिने आता या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.नुकतच राखी सावंत आणि अपूर्वा नेमळेकर यांचे जोरदार भांडण झालं. या भांडणात राखी इतकी संतापली की तिने घरातली भांडी फोडली. फक्त एक कॉफी न मिळाल्याने तिला तिचा राग अनावर झाला. 



पण आता ही भांडी फोडणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.घरातील सदस्यांनी तिची कॉफी लपवल्याचा तिला संशय होता. “मला माझी कॉफी द्या” असं म्हणत तिने अपूर्वा नेमळेकरशी कडाक्याचं भांडण केलं. इतकच नाही तर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. इतकच नाही तर राखी अक्षय केळकरच्या अंगावरही धावून गेली. संतापाच्या भरात तिने स्वयंपाक घरातली भांडी फोडली. राखीचा हे वागणं पाहून घरातली इतर सर्वच सदस्य तिच्या विरोधात गेले आणि त्यांनी तिच्या या वागण्याचा निषेध नोंदवला.राखीचा वागणं पाहून घरातील इतर सदस्यांनी राखीवर नोंदवलेल्या निषेधाची ‘बिग बॉस’ने दखल घेतली आणि “राखी शिक्षेस पात्र आहे” असं म्हणत तिला पुढील आठवड्याच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राखी डेंजर झोनमध्ये गेली आहे. सगळेच इतर स्पर्धक तिच्या विरोधात असल्याने ती पुढील आठवड्यात घराबाहेर जाणार का हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने