फ्रान्स का अर्जेंटिना; 165 कोटींची ट्रॉफी कोणाच्या खिशात जाणार?

कतार :  विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने सहाव्यांदा फिफा विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मंगळवारी मध्यरात्री खचाखच भरलेल्या लुसेल स्टेडियममध्ये मेस्सीच्या नावाचाच गजर सुरू होता. मेस्सीनेही देशासाठी खेळताना नेहमीप्रमाणे निःस्वार्थ खेळ केला. लिओनेल मेस्सी व लहानपणी त्याला आदर्श माननारा ज्युलियन अल्वारेझ यांनी केलेल्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने क्रोएशियावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि जेतेपदाची लढत निश्चित केली.



तर आज उपांत्य फेरीत धडाकेबाज फ्रान्सने मोरोक्कोचा स्वप्नवत प्रवास रोखून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. थिओ हेर्नांडेझ आणि कोलो मुआनीकडे यांनी गोल केले. फ्रान्सने मोरोक्कोला पराभूत करून अंतिम फेरी गाठली, त्याआधी अर्जेंटिनाने क्रोएशियाला हरवून अंतिम फेरी गाठली. विश्वविजेतेपदासाठी आता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी महामुकाबला होणार आहे. तुम्हाला माहीत आहे का फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाला मिळणाऱ्या ट्रॉफीची किंमत 165 कोटी रुपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने