JEE, CUET आणि NEET परीक्षेच्या तारखा जाहीर; असे पाहा वेळापत्रक

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE, NEET इत्यादी परीक्षांसाठी शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. NTA ने त्यांच्या वेबसाईटवर कॅलेंडर (NTA Exam Calendar 2023) बद्दल माहिती दिली आहे.जे विद्यार्थी 2023 मध्ये या स्पर्धा परीक्षांना बसणार आहेत ते अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात. NTA ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा UG, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा तसेच संयुक्त प्रवेश परीक्षेचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे.यासोबतच NTA ने JEE मुख्य परीक्षेसाठी (JEE Main Exam 2023) ऑनलाइन नोंदणीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत, त्यानुसार विद्यार्थी 19 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत नोंदणी करू शकतात.



महत्वाच्या तारखा..

JEE 2023 सत्र 1 - 24, 25, 27, 28, 29, 30, 31 जानेवारी 2023

JEE 2023 सत्र 2- 6,7,8,10, 11, 12 एप्रिल 2023

NEET UG 2023 - 7 मे 2023

CUET 2023 - 21 मे ते 31 मे 2023

NTA परीक्षा कॅलेंडर 2023 परीक्षेच्या तारखा तपासण्यासाठी या गोष्टी करा.

१. - शैक्षणिक कॅलेंडर तपासण्यासाठी, सर्वप्रथम NTA च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा.

२. - दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाइटच्या होमपेजवरील ताज्या बातम्या विभागात जा.

३. - ताज्या बातम्यांच्या विभागावरील शैक्षणिक कॅलेंडरच्या लिंकवर क्लिक करा.

४. - लिंकवर क्लिक केल्यानंतर महत्त्वाच्या परीक्षांचे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल.

५. - आता ते तपासा आणि भविष्यासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने