महिलांचा जीव मोलाचा; सीरमकडून पहिली मेड इन इंडिया 'HPV' लस लाँच

दिल्ली: विविध आजारांना रोखण्यासाठी सीरमच्या लसींनी मोलाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच उद्भवलेल्या कोरोना काळातही सीरमने कोविशिल्ड लस बाजारात आणून करोडो लोकांचे जीव वाचवले आहेत.त्यानंतर आता सीरमकडून मेड इन इंडिया HPV लस लाँच करण्यात आली आहे. याबाबत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या लसीमुळे महिलांमधील सर्विकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशायाच्या कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होणार आहे.आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. तसेच या महिन्यात गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जागरूकतादेखील केली जात आहे. या दिवसाचे महत्व लक्षात घेता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारतातील पहिली मेड-इन-इंडिया HPV लस लाँच केली आहे, असे अदार पूनावाला यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने