चीनी कंपन्यांना टक्कर देणार 'हा' भारतीय ब्रँड, आणणार स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन

दिल्ली: कमी किंमतीत शानदार ऑडिओ प्रोडक्ट्स लाँच करणारी भारतीय कंपनी Mivi लवकरच स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. भारतीय कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेली Mivi ५जी फोन आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा दावा आहे की हा पहिला असा स्मार्टफोन असेल, जो पूर्णपणे मेड इन इंडिया टॅग अंतर्गत लाँच केला जाईल.सध्या इतर कंपन्या भारतात स्मार्टफोनचे असेंबलिंग करतात. याचे डिझाइन दुसऱ्या देशात केले जाते. सोबतच, स्मार्टफोनचे पार्ट्स देखील बाहेरून मागवले जातात. मात्र, Mivi च्या फोनला भारतातच डिझाइन केले जाईल. याशिवाय, मॅन्यूफॅक्चरिंग आणि असेंबलिंग देखील देशांतर्गतच होईल.



Mivi ब्रँडच्या सह-संस्थापक मृदुला देवाभक्तूनी यांनी माहिती दिली की, Mivi ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनची तयारी सुरू झाली आहे. याच्या रिसर्चवर काम सुरू आहे. पुढील काही वर्षात Mivi ब्रँडचा स्मार्टफोन बाजारात पाहायला मिळेल. त्यांनी फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि लाँच तारखेचा खुलासा केलेला नाही. मात्र, फोनची किंमत कमी असेल असे त्यांनी सांगितले.पुढील एक-दोन वर्षात कंपनीचा फोन बाजारात पाहायला मिळू शकतो. तसेच, भारतांतर्गत फोनची निर्मिती करणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

कंपनीच्या ऑडिओ प्रोडक्ट्सला जबरदस्त मागणी

Mivi ब्रँड सध्या वियरेबल आणि ऑडिओ प्रोडक्ट्स लाँच करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच स्मार्टवॉचला लाँच केले आहे. तसेच, कंपनीचे ऑडिओ साउंड बार देखील बाजारात उपलब्ध आहे. कंपनीने साउंड बार सेगमेंटमध्ये २५ टक्के बाजारावर कब्जा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने