सरन्यायाधीश दत्तक मुलींना घेऊन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात, कारण...

नवी दिल्ली : सीजेआय डी. वाय. चंद्रचूड सकाळी 10च्या सुमारास आपल्या दोन दिव्यांग मुलींना घेऊन सुप्रीम कोर्टात पोहोचले. तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सीजेआय चंद्रचूड यांनी दोन दिव्यांग मुलींना दत्तक घेतले आहे. सीजेआय चंद्रचूड यांनी माही (१६) आणि प्रियांका (२०) यांना सोबत सुप्रीम कोर्टात आणले.चंद्रचूड यांनी जिथून वकील आणि पक्षकार कोर्ट क्रमांक एकमध्ये जातात तिथूनच दोघांनी व्हील चेअरवरून सीजेआय कोर्ट रूम नंबर 1 मध्ये नेले. त्यानंतर कोर्ट कसे कार्य करते हे दोघींना दाखवण्यात आले.



दोघींना न्यायाधीश कुठे बसतात आणि वकील कुठे युक्तीवाद करतात हे दाखवून दिले. न्यायालयाचे कामकाज कसे चालते, हेही स्पष्ट केले गेले. सीजेआयही त्या दोघींना घेऊन आपल्या चेंबरमध्ये गेले आणि त्यांना चेंबरही दाखवले.सुप्रीम कोर्टातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली मागील काही काळापासून सुप्रीम कोर्ट पाहायचे म्हणत होत्या. त्यामुळेच सीजेआयने या दोघींनाही सांगितलं की, आज आपण कोर्टात जाऊया. मात्र थंडीमुळे सीजेआयने या दोघींना सुप्रीम कोर्टात फारसे फिरवले नाही. तसेच काही वेळाने त्यांना परत पाठवले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने