विराट जिथे नतमस्तक झालाय 'त्या' बाबांपुढे खुद्द स्टीव्ह जॉब्ज देखील डोके टेकायचा

मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये विराट आपल्या पत्नी मुलीसह वृंदावन इथं नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट देताना दिसतो. तर नीम करोली बाबा आहेत तरी कोण? असे सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.विराट कोहलीने नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट दिल्याचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियाला व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तराखंडमधील नीम करोली बाबा यांचे आश्रम चर्चेत आले आहे.



हे आश्रम जगभरात प्रसिद्ध असल्याचे बोलले जात आहे. या आश्रमात अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही भेट देऊन बाबा नीम करोली यांचे दर्शन घेतले आहे.अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 1974 ते 1976 दरम्यान भारताला आध्यात्मिक प्रवासासाठी भेट दिली होती. कैंची धाम आश्रमात पोहोचल्यावर बाबांनी समाधी घेतली होती. बाबांच्या आश्रमातून त्यांना अॅपलच्या लोगोची कल्पना सुचल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की, करौली बाबांना सफरचंद खूप आवडतात, त्या काळात ते हे फळ मोठ्या उत्साहाने खात, त्यामुळेच स्टीव्हने त्यांच्या कंपनीच्या लोगोसाठी कापलेले सफरचंद निवडले. असे सांगण्यात येत आहे.

उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी एक छोटास आश्रम आहे. नाव आहे- नीम करोली बाबा आश्रम. अतिशय शांत, स्वच्छ जागा, हिरवळ, शांतता. नैनिताल-अल्मोरा मार्गावर समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर असलेला हा आश्रम धार्मिक लोकांमध्ये कैंची धाम म्हणून लोकप्रिय आहे. हा आश्रम बाबा नीम करोली महाराज यांच्या समर्पणाने बांधण्यात आले आहे. बाबा नीम करोली श्री हनुमानाजींचे महान भक्त होते. बाबा यांना त्यांचे भक्त हनुमानाचा अवतार मानत होते.

कोण आहेत नीम करोली बाबा ?

बाबा नीम करोली यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर गावात झाला. लक्ष्मी नारायण शर्मा हे त्यांचे जन्मावेळचं नाव आहे.नैनिताल, भुवलीपासून 7 किमी अंतरावर असलेल्या कैंची धाम आश्रमाची स्थापना बाबांनी 1964 मध्ये केली होती. 1961 मध्ये ते पहिल्यांदा येथे पोहोचले आणि त्यांचा मित्र पूर्णानंदसोबत आश्रम बांधण्याचा विचार केला. बाबांच्या चमत्कारांची उत्तराखंडमध्येच नव्हे, तर परदेशातही चर्चा होते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गही त्यांचे भक्त आहेत.वयाच्या 17 व्या वर्षी बाबा नीम करोली यांना देवाबद्दल विशेष ज्ञान मिळाले. ते हनुमानजींना आपले गुरू मानत होते. बाबांनी आपल्या आयुष्यात जवळपास 108 हनुमान मंदिर बांधली आहेत. सामान्य माणसासारखे बाबा नीम करोली जगले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स, अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांसारख्या सेलिब्रिटींचाही बाबांच्या भक्तांमध्ये समावेश आहे. त्यांनीही कैंची धाम आश्रमात येऊन दर्शन घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने