दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; ७९१४ जागांवर भरती

मुंबई : दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) च्या रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. ७ हजार ९१४ पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

मॅट्रिक्युलेशन (मॅट्रिक्युलेट किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये १० वी) एकूण किमान ५०% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT/SCVT (ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे) द्वारे प्रदान केलेले ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र.




रिक्त जागांचा तपशील

एकूण - ७९१४ पदे

SCR Apprentice - ४१०३

SER Apprentice - २०२६

NWR Apprentice - १७८५

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय २४ वर्षांच्या आत असावे.


निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

पगार

वेतनश्रेणी नियमांनुसार असेल.

अर्ज कसा करायचा ?

इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक -

१. http://34.93.184.238/instructions.php

२. https://iroams.com/RRCSER/applicationAfterIndex

३. https://rrcjaipur.in/

अर्ज शुल्क

Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 0/-

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने