काश्मीरमध्ये एकाचवेळी दोन हिमस्खलन! बर्फाचा डोंगर कोसळल्याचा व्हिडिओ कॅमेरॅत कैद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आज दिवसभरात दोन ठिकाणी हिमस्खलनाच्या घटनांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बर्फाचा डोंगर कोसळल्याची ही भीषण घटना कॅमेरॅत कैद झाली आहे. दरम्यान, या हिमस्खलनात कोणतीही हानी झाल्याचं अद्याप वृत्त नाही.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात दोन हमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यांपैकी एक कमी तीव्रतेचा तर एक जास्त तीव्रतेचा होता. यांपैकी एका हिमस्खलनानंतर महामार्गावर आलेला राडारोडा हटवण्यात आला आहे. 



त्यामुळं सोनमर्गपर्यंत वाहतूक सुरु आहे. त्याचबरोबर दुपारी १ वाजेपर्यंत वीज कनेक्शनही सुरळीत सुरु करण्यात आलं आहे.सरबल भागातील राडारोडा हटवण्यात आला आहे. यानंतर आता इथल्या सर्व गोष्टी रुळावर येतील अशी आशा आहे. पण या भागात राहणाऱ्या लोकांनी अद्याप घराबाहेर पडू नये तसेच पुढील आदेश येईपर्यंत अनावश्यक प्रवासही करु नये असंही प्रशासनानं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने