रोनाल्डोसाठी काय पण! सौदी अरेबिया बदलणार कठोर इस्लामिक कायदा

सौदी अरेबिया: प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अल-नासर एफसीसोबत करार केला आहे. रोनाल्डोने अल-नासर फुटबॉल क्लबकडून वर्ष २०२५ पर्यंत खेळणार आहे. ३ वर्षांच्या या करारासाठी क्लबने तब्बल १७५० कोटी रुपये मोजले आहेत.या करारामुळे आता रोनाल्डोला सौदी अरेबियात वास्तव्य करावे लागणार आहे. मात्र, यामुळे सौदी अरेबियातील एका कायद्याचे उल्लंघन होत आहे. रोनाल्डो सध्या त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिगेजसोबत सौदीत राहत आहे. तेथील कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती लग्नाशिवाय एखाद्या महिलेसोबत राहू शकत नाही. कायद्याचे उल्लंघन केल्याने रोनाल्डोला शिक्षा होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.



रोनाल्डोसाठी सौदी अरेबिया बदलणार कायदा?

रोनाल्डो आणि जॉर्जिना रोड्रिगेज हे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. मात्र, सौदी अरेबिया या कायद्यातून रोनाल्डोला सूट देऊ शकते. त्याला लग्नाशिवाय गर्लफ्रेंडसोबत राहिल्यास शिक्षा होणार नाही.रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या एका वकिलाने माहिती दिली की, लग्नाशिवाय महिलेसोबत राहणे या देशात गुन्हा आहे. परंतु, अशा प्रकरणावर नेहमीच नरमाईची भूमिका घेतली जाते. परदेशी व्यक्तीच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. नागरी अधिकारांच्याबाबतीत सौदी अरेबिया प्रगत होत चालला आहे.दरम्यान, या प्रकरणावर अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. परंतु, रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला या कायद्यापासून सुटका मिळू शकते. तसेच, करार संपेपर्यंत सोबत राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने