अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी.. ओळखीच्याच व्यक्तीने केला हात साफ..

मुंबई: अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकर हिनं मराठी मनोरंजन विश्वात स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच आपल्या घरचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते .त्या व्हिडिओमुळे ती चर्चेतही असते. मात्र सध्या ती वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरात चोरी झाली आहे. तिच्या घरात चोरी झाल्याचं प्रकरण आताच समोर आलं आहे. त्याच बरोबर ही चोरी कोणी केली आहे त्याव्यक्तीचं नावं ही समोर आलं आहे. तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली आहे असा आरोप क्रांतीने केला आहे.



तिच्या घरातील काही मौल्यवान साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याचं तिच्या नजरेस आलं. क्रांतीने स्वत:हा याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हाची नोंद केली असून आता प्रकरणातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत. याप्रकरकणाबद्दल पोलिसांनीही काही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकर यांनी एका एजन्सी मार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत तिने ही चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा तपास करत असून त्या महिलेचा देखील शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने