अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला, आता एक डॉलर...

नवी दिल्ली: आंतरबँक परकीय चलन बाजारात मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १८ पैशांनी वधारून ८२.१७ वर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या घसरलेत्या किंमती आणि परकीय चलन काढून घेण्याचा वाढलेला ओघ तसेच देशांतर्गत समभागांमधील कमकुवतपणामुळे गुंतवणूकदार प्रभावित झाले आहे. त्यामुळे आज रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ मर्यादित राहिल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.आंतरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.२० वर खुला झाला. काही वेळानंतर 18 पैशांची वाढ नोंदवत रुपया 82.17 वर पोहोचला. याआधीच्या सत्रात म्हणजेच सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.३५ वर बंद झाला होता.



दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत अमेरिकन डॉलर कमकुवत किंवा मजबूत झाल्याचा अंदाज घेणारा डॉलर निर्देशांक ०.२१ टक्क्यांनी वाढून १०३.२१ वर पोहोचला आहे.मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने सुरुवातीची आघाडी गमावली असून रेड लाईनवर व्यापार होत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३९०.८५ अंकांच्या घसरणीसह ६०,३५६.४६ च्या पातळीवर, म्हणजेच ०.६४% घसरणीसह व्यवहार करत होता, तर निफ्टी १०४.८० अंकांच्या घसरणीसह १७,९९६.४० च्या जवळपास व्यवहार करत होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने