हुकूमशाह किम जोंग उन आजारी; 9 वर्षाची मुलगी चालवणार देश?

उत्तर कोरिया: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आजारी असल्याचा दावा कित्येक प्रसारमाध्यमांकडून केला जात आहे. तर काही जणांकडून असं सांगण्यात येतंय की, तो आपल्या मुलीला आणि बहिणीला उत्तर कोरियाचा कारभार सांभाळण्यासाठी ट्रेनिंग देत आहे. तो आपल्या कुटुंबाची शक्ती मजबूत करू इच्छित असल्यामुळे तो तयारीला लागल्याचे अनेक तज्ज्ञांचं मत आहे.



दरम्यान, काही दिवसांपुर्वी किम जोंग उन यांनी आपल्या मुलीला अणुचाचणी पाहण्यासाठी आणले होते. ती फक्त नऊ वर्षाची असून तिचा चेहरा पहिल्यांदाच जगासमोर आला होता. त्यानंतर आता त्यांना देशाचा कारभार चालवण्यासाठी ट्रेनिंग दिलं जात असल्याचा दावा केला जात आहे. द सन या वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार, किम जोंग उन यांचा मृत्यू जरी झाला किंवा त्यांना सुप्रीम लीडरच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले तरी उत्तर कोरियावर त्यांचेच राज्य असेल.किम जोंग उन यांच्यानंतर त्यांची शक्तिशाली बहिण किम यो जोंग आणि मुलगी उत्तर कोरियावर राज्य करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने