संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; अजामीनपत्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

मुंबई:  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला होता. 

दोन दिवसांपूर्वी, भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा जेलवारी घडवणार असं विधान केलं होतं. अशातच आज राऊतांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.मेधा सोमय्या यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.




काय आहे नेमकं प्रकरण?

संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला आहे. राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा दावा राऊतांनी केला. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा केला. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा केल्याचा दावा राऊतांनी केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने