टीम इंडियाच्या पराभवानंतर सुनील गावसकर यांचे मोठे विधान, म्हणाले...

मुंबई:  श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचा युवा संघ खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने मालिकेची सुरुवात विजयाने केली, मात्र दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवर स्विकारावा लागला. संघाच्या पराभवानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मोठं विधान केलं आहे. जे सध्या चर्चेत आहे.



काय म्हणाले गावसकर?

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या होत्या. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी एकूण 7 नो बॉल टाकले होते, त्यापैकी एकट्या अर्शदीप सिंगने 5 नो बॉल फेकले. सुनील गावसकर यांनी या खराब गोलंदाजीवर कडाडून टीका केली आहे.स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजीवर संताप व्यक्त केली आहे. 'व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही हे करू शकत नाही. आपण अनेकदा ऐकतो की खेळाडू म्हणतात की आज गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, परंतु नो बॉल फेकणे आपल्या नियंत्रणात नाही. तुम्ही गोलंदाजी केल्यानंतर काय होते, फलंदाज काय करतो हा वेगळा मुद्दा आहे. नो बॉल टाकू नये हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे.

अर्शदीप सिंगचा लाजिरवाणा पराभव

अर्शदीप सिंगच्या खराब गोलंदाजीमुळे भारताचा पराभव झाला. अशी चर्चा क्रिकेट जगतात सुरु आहे. त्याने 2 षटकात 5 नो-बॉलसह 37 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. अर्शदीप सिंग टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज बनला आहे. याचबरोबर अर्शदीप सिंग टी-२० क्रिकेटमध्ये सलग ३ नो बॉल टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.उभय संघांमधील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय संघाचा खराब खेळ पाहता, शेवटच्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये बदल करू शकते, असे मानले जात आहे. पण राहुल द्रविड म्हणाला, 'मी तिसऱ्या सामन्याबद्दल विचार केलेला नाही. तिथे गेल्यावर विकेट बघू. पण मला जास्त प्रयोगांची अपेक्षा नाही. जे खेळाडू आधीच खेळत आहेत ते खूप तरुण संघ आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने