उर्वशी रिषभला भेटायला रुग्णालयात? 'त्या' फोटोने चर्चांना उधाण

मुंबई: क्रिकेटर रिषभ पंत याचा नुकताच अपघात झाला आहे. त्याच्यावर सध्या मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच विषयी आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या एका फोटोची चर्चा सुरू झाली आहे.अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत यांच्या अफेअर्सच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता उर्वशीच्या या फोटोमुळे या चर्चांमध्ये भर पडली आहे.



उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली आहे. या स्टोरीमध्ये तिने रिषभवर उपचार सुरू असलेल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाच्या बाहेरचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता उर्वशी रिषभला भेटायला रुग्णालयात गेली की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.रिषभ पंतचा उत्तराखंडजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये त्याच्या गाडीने पेट घेतला, मात्र वेळेवर रिषभ बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर काही वेळातच उर्वशीने एक पोस्ट केली होती.उर्वशीने पांढरे कपडे आणि डायमंड ज्वेलरीमधला एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने (प्रार्थना करत आहे), अशी एक ओळही टाकली आहे. त्यावरुन पुन्हा एकदा या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने