संतापजनक! चक्क बीयरच्या बॉटलवर छापला महालक्ष्मीचा फोटो

ब्रिटन:  ब्रिटनने पुन्हा एकदा हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. ज्यात एका बीयरच्या बाटलीवर चक्क हिंदू देवी महालक्ष्मीचा फोटो छापला आहे. या मुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या कंपनीचा विरोध केला जात आहे. कंपनीने हे उत्पादन बंद करण्याची मागणी केली जात आहे. देवीचा फोटो छापून बीयर विकली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.



इनसाइट यूके नावाच्या एका ट्वीटर हँडलवरून याविषयीची माहिती देण्यात आली आहे. ही कंपनी हिंदूंच्या भावना दुखवणारं उत्पादन विकत असल्याचा आरोप होत आहे. ब्रिटनच्या हिंदू समाजाने हे उत्पादन त्वरीत बंद करून मागे घेण्याची मागणी केली आहे.हा देवीचा फोटो असलेली दारुची बाटली ३. ६५ युरो (3,65 €) म्हणजे ३२०.७७ रुपयांची आहे. शिवाय या दारूच्या ६ बाटल्यांच्या कॅरियरवर काही सूटही देण्यात येत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती पुरवली जात आहे.खरंतर बीयरच्या बाटलीवर हिंदू देवीचा फोटो छापण्याचा काही संबंध नसताना करण्यात आलेला हा प्रकार संतापजनक असल्याची भावना समाजात पसरत आहे. वेगवेगळ्या स्तरातून याचा विरोध केला जात आहे. हा सगळाच प्रकार भारतीयच नाही तर जगभरातील सर्वच हिंदूंसाठी तापदायक ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने