'मरण येणार असेल तर येऊ देत..', कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला तयारच नव्हता संजय दत्त, कारण...

मुंबई:  बॉलीवू़ड अभिनेता संजय दत्तनं कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात केली आहे. २०२० मध्ये संजय दत्तला स्टेज ४ चा कॅन्सर झाला होता. आणि ही बातमी ऐकून अख्ख् दत्त कुटुंब हादरलं होतं.पण या कठीण प्रसंगात संजय दत्तनं आपली हिम्मत हारली नाही. तो स्वतः देखील खंबीर राहिला आणि त्यानं आपल्या कुटुंबाला देखील हिम्मत हारू दिली नाही. पण तुम्हाला माहित आहे का कॅन्सर झाला हे जेव्हा संजय दत्तला कळलं तेव्हा तो त्यावर उपचार घेण्यासाठी मुळीच तयार नव्हता. संजय दत्तनं नुकतंच याविषयी एका कार्यक्रमा दरम्यान खुलासा केला आहे. त्यानं आपल्या कॅन्सच्या लढ्याविषयी बातचीत केली. त्यावेळी संजयवर ज्या डॉक्टरांनी उपचार केले ते डॉक्टरही हजर होते.जेव्हा त्या कार्यक्रमात संजयला विचारलं गेलं की,'कॅन्सर झाल्याचं कळताच तुझी रिअॅक्शन कशी होती?' ,तेव्हा संजय दत्तनं उत्तर देत म्हटलं की-''मला कंबरेत प्रचंड वेदना होत होत्या. मी गरम पाण्याच्या पिशवीनं कमरेला शेक देत होतो, पेन किलर्स घेत होतो. आणि त्यानंतर एक दिवस मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला''.



''मला तेव्हा हॉस्पिटलला नेलं गेलं. तेव्हा मला कॅन्सर झालाय हे सांगितलं गेलं खरं.. पण तो शेवटच्या स्टेजचा आहे अशी पूर्ण माहिती मला दिली गेली नाही. मी हॉस्पिटलमध्ये एकटा होतो''.''माझी बायको, बहिण, माझ्या कुटुंबातलं कुणीच नव्हतं माझ्यासोबत. मी एकटा होतो आणि अचानक एक व्यक्ति माझ्याजवळ आला व म्हणाला,'मला कॅन्सर झाला आहे'. माझी पत्नी त्यावेळी दुबईत होती. त्यामुळे मग माझी बहिण प्रिया मला सोबत करायला आली.'''' माझ्या कुटुंबात कॅन्सरची हिस्ट्री आहे. माझ्या आईला Pancreatic Cancer होता. माझी पहिली पत्नी रिचा शर्माचा मृत्यू देखील ब्रेन कॅन्सरनं झाला होता. त्यांच्या वेदना मी जवळून पाहिल्या होत्या. म्हणून पहिली गोष्ट तर मी त्यावेळी बोललो होतो की मला कीमोथेरपी घ्यायची नाही. जर मला मरण आलं तरी चालेल पण मी ट्रीटमेंट घेणार नाही''.

संजय दत्त पुढे म्हणाला की,'' राकेश रोशन यांनी मला कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचे नाव सजेस्ट केले होते. त्या कठीण प्रसंगात मला खंबीर रहावं लागलं. मी फक्त माझ्या कुटुंबासाठी उपचार करण्यास तयार झालो''.संजय पुढे म्हणाला, ''मी माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला तुटताना पाहिलं आणि मग उपचारांसाठी तयार झालो. मी एका रात्रीत निर्णय घेतला. कारण मला माहित होतं मी आजारपणात हिम्मत हारली तर माझं अख्खं कुटुंब तुटून जाईल. आणि मग मी कॅन्सरशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला''.संजय दत्त खुलासा करत म्हणाला,''मी माझ्या आजाराविषयी काहीच लपवलं नाही. कॅन्सरविषयी कोणतीच खोटी माहिती दिली नाही.. लोकांना असे विषय समोर आणायचे नसतात ,ते बोलत नाहीत. पण मी माझ्या करिअरचा विचार केला नाही,त्यापेक्षा अधिक मी यावर बोलणं योग्य समजले. जेणेकरुन माझ्या अनुभवांचा कुणालातरी फायदा होईल''.

संजय दत्तच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर त्याचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा आहे 'शमशेरा'. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. संजयचे आता कितीतरी सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत.तो हिंदी इंडस्ट्रीतच नाही तर साऊथच्या सिनेमातूनही आता काम करताना दिसत आहे . वयाच्या साठीनंतर संजय दत्त खूप एक्सपेरिमेंटल रोल्स करताना दिसत आहे. आणि त्याच्या या वैविध्यपूर्ण भूमिका प्रेक्षकांची प्रशंसा मिळवताना देखील दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने