971 कोटी रुपयांच्या संसद भवनाच्या नव्या इमारतीची खासियत माहिती आहे का?

दिल्ली: छ सध्या देशात नव्या संसदच्या इमारतीवरुन चर्चा रंगली आहे कारण नव्या संसद भवनचा नवा अन् फर्स्ट लूक जारी करण्यात आलाय. यावर्षी मार्चमध्ये या नव्या संसद इमारतीचं उद्धाटन होण्याची शक्यता आहे.नवं संसद भवन मोठे हॉल, लायब्ररी, सुविधाजन्य पार्किंग सोबत अनेक आधुनिक सुविधांनी परिपुर्ण आहे. सध्या या इमारतीच्या फर्स्ट लूकचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



आज आपण या 971 कोटी रुपयांच्या संसद भवनाच्या नव्या इमारतीची खासियत जाणून घेणार आहोत.

  • उत्तम स्पेस मॅनेजमेंट

  • Z आणि Z+ लेव्हलची सिक्युरीटी

  • संसदेच्या नव्या इमारतीत एकावेळी 1,224 खासदार बसण्याची व्यवस्था

  • लोकसभेत 888 खासदार बसू शकतात तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात.

  • या नव्या संसद भवनाच्या इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आलाय.

  • लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन सारख्या सुविधाही आहे.

  • हि इमारत पुर्णपणे भुकंप प्रतिरोधक आहे.

  • याशिवाय या इमारतीच्या टेरेसवर राष्ट्रीय प्रतिक चिन्ह उभारण्यात आलंय ज्यांचं काही दिवसापूर्वी मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.

या इमारतीचा फर्स्ट लूक जारी करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. अनेक नेटकऱ्यांनी यावर टिका सुद्धा केली. देशातील शेतकरी शेतीत दिवसरात्र राबतो पण नेते लोकांना बसण्यासाठी एवढं आलिशान इमारत कशाला? अशा आशयाचे अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने