चंद्रावरील एक खड्डा अन् ग्रहाला नाव देण्यात आलेले निकोला टेस्ला कोण होते?

मुंबई: तूम्ही रोज इंटरनेट वापरता. कधीतरी नेट संपल्यावर तूम्ही एखाद्याकडे वायफायचा पासवर्ड मागितला असेल. पण, ते वायफाय शोधले कोणी हे तूम्हाला माहिती आहे का? तर, या शोधाचे जनक आहेत थोर वैज्ञानिक निकोला टेस्टा. या थोर शास्त्रज्ञाचे नाव एका लघुग्रहाला देखील देण्यात आले आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांच्या या शोधाबद्दलच्या काही गोष्टी पाहुयात.अमेरिकन संशोधक,इंजिनिअर निकोला टेस्ला यांना वाय-फायचे जनक मानले जाते. कोणत्याही प्रकारची वायर न वापरता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सिग्नल पाठवण्याचे तंत्र त्यांनी शोधले.निकोला टेस्ला यांना सर्बो-क्रोएशीयन, चेक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, आणि लॅटीन या आठ भाषा येत होत्या. त्यांनी केवळ वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लावलेला नाही. तर त्यांनी एसी करंट, टेस्ला वेव्स, विजेपासून चालणारी मोटर,रोबोटिक्स, रिमोट कंट्रोल, रडार, एक्स रे अशा अनेक गोष्टींचा अविष्कार केला आहे.

टेस्ला यांचा जन्म 10 जुलै 1856 रोजी झाला. वैज्ञानिक विकासाच्या क्षेत्रात ते आपल्या समकालीन लोकांपेक्षा खूप पुढे होते आणि दूरदर्शी विचारसरणीचे होते. त्यांच्या स्मरणार्थ अमेरिकेने 10 जुलै हा निकोला टेस्ला दिवस म्हणून घोषित केला आहे. या दिवशी त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो.निकोला टेस्ला यांचा जन्म सध्याच्या क्रोएशियामध्ये झाला. त्याचे वडील मिलुटिन टेस्ला हे सर्बियन ऑर्थोडॉक्स होते. येथून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १८७३ मध्ये ऑस्ट्रियातील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि प्राग विद्यापीठात शिक्षण घेतले. सर्वप्रथम त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणितात प्रावीण्य मिळवले.




जेव्हा टेस्ला शाळेत होते तेव्हा गणिताचे कठीण प्रश्न केवळ मनातल्या मनात सोडविण्यास ते सक्षम होते. त्यांच्या शिक्षकांची शिकवणी होण्याआधीच ते आपला अभ्यासक्रम अल्पावधीतच पूर्ण करायचे.1881 मध्ये त्यांनी बुडापेस्टमधील एका टेलिफोन कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. या काळात त्यांनी पॉलीफेस तत्त्वाचा वापर करून जनरेटर तयार केला.टेस्लांनी कधी लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, विज्ञानासाठी ते आपले संपुर्ण आयुष्य देत आहेत. संपुर्ण आयुष्य विज्ञानासाठी देणाऱ्या या व्यक्तीच्या ड्रेसिंग सेंसवर महिला वेड्या होत्या. असे असूनही ते अविवाहीत राहिले.

टेस्ला यांचे म्हणणे होते की, अंधार समाप्त करून प्रकाशाचे एक नवीन युग सुरू करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. पृथ्वीच्या वरील वायुमंडळामध्ये गॅस विद्यूत धारा घेऊन जाण्यास सक्षम आहे. त्यामुळे रात्री देखील प्रकाश राहू शकतो. जो शिपिंग लेन आणि हवाई अड्ड्यांना सुरक्षित बनवले आणि पुर्ण शहराला प्रकाशमय करेल. मात्र टेस्ला यांचा हा प्रयोग कधीच पुर्ण झाला नाही.1890 ते 1906 पर्यंत टेस्ला यांनी वायरलेस पद्धतीने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वीज पोहोचवण्याच्या मार्गावर काम केले. त्यात ते अशस्वी झाले. परंतु त्यांची कल्पना नंतर लेसर किरणांचा आधार बनली होती. या आधारे त्यांनी आकाशात चमकणारी लाखो व्हॉल्ट वीज तयार केली तेव्हा सर्व चकित झाले.टेस्ला यांच्या विज्ञानक्षेत्रातील योगदानाबद्दल चंद्रावरील 2 किलोमीटर व्यास असलेल्या एका खड्ड्याला टेस्ला यांचे नाव देण्यात आले आहे. तर, मंगळ आणि गुरू ग्राहदरम्यान आढळल्या एक लघुग्रहाल 2244 टेस्ला हे नाव देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने