मेगन मार्कलमुळे प्रिन्स हॅरी आणि विल्यम्स यांच्यात हाणामारी; हॅरीच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील ‘तो’ किस्सा

मुंबई: ब्रिटनचं राजघराणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण आहे प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम या दोघांमध्ये झालेला राडा. या राड्याचं कारण ठरली मेगन मार्कल. मेगन मार्केलला डचेस ऑफ सक्सेस अशी उपाधीही मिळाली आहे. मात्र ब्रिटनच्या राजघराण्याचे छोटे राजकुमार प्रिन्स हॅरी यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं ज्यात मेगन वरून दोन भावांमध्ये कसा राडा झाला ते सांगितलं आहे. या आत्मचरित्राचं नाव स्पेअर असं आहे.

स्पेअर हे आत्मचरित्र प्रकाशनाआधीच लिक

स्पेअर हे प्रिन्स हॅरीने लिहिलेलं आत्मचरित्र प्रकाशित होण्याआधीच लिक झालं आहे. या आत्मचरित्रात प्रिन्स हॅरीने हा दावा केला आहे प्रिन्स विल्यमने मेगन मार्कलवरून झालेल्या भांडणात मला धक्का मारला आणि मारहाण केली होती. मेगन मार्कलवरून मी आणि माझा भाऊ विल्यम चांगलेच भांडलो होतो. आमच्यात हमरीतुमरी आणि मारामारी झाली होती. एवढंच नाही तर प्रिन्स हॅरीने त्याच्या आत्मचरित्रात हेदेखील म्हटलं आहे की ही मारामारी किंवा वाद एकदाच झाला नव्हता अनेकदा झाला आहे.



काय घडलं होतं? प्रिन्स हॅरीने काय म्हटलं आहे?

प्रिन्स हॅरीने त्याच्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे की विल्यम एक दिवस माझ्या खोलीत आला. त्यावेळी त्याने मेगनविषयी एक टिपण्णी केली. त्यानंतर तो माझ्या अंगावर धावून आला. त्याने माझी कॉलर पकडली आणि तोंडावर ठोसा लगावला. एवढंच नाही तर त्याआधी त्याने मेगनलाही खूप दुषणं दिली. ती उद्धट आणि भांडकुदळ आहे असंही त्याने म्हटलं होतं. मला त्याने जेव्हा खाली पाडलं तेव्हा माझ्या पाठीखाली कुत्र्याला खायला देतात तो बाऊल आला होता जो फुटला आणि त्याचे तुकडे मला बोचले होते असं हॅरीने म्हटलं आहे.हॅरी आणि मेगन मार्कल या दोघांचं लग्न राजघराण्याला पटलेलं नाही. राजघराण्यात मारले जाणारे टोमणे, दिली जाणारी दुषणं यामुळे त्यांनी राजघराणं सोडलं आणि कॅलिफोर्नियात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. राजघराण्यातून बाहेर पडल्यानंतर प्रिन्स हॅरीने आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याचं ठरवलं होतं. पेग्विंग रँडम हाऊसने कुठेही लिक होऊ नये याचे प्रयत्न केले होते. मात्र ते अपयशी ठरले या आत्मचरित्राला हा मजकूर लिक झाला आहे. त्यामुळे मेगन मार्कलवरून दोन भाऊ कसे भिडले होते हे आता जगाला समजलं आहे.

कोण आहे मेगन मार्कल?

राजघराण्यात येण्याआधी मेगन मार्कल ही एक अभिनेत्री होती. २०११ ते २०१८ या कालावधीत मेगनने सूट्स मध्ये रेचल जोन ही भूमिका साकारली होती. सूट्स हा एक अमेरिकन टीव्ही ड्रामा होता आणि तो सुपरहिट झाला होता. मेगनजा जन्म ४ ऑगस्ट १९८१ ला लॉस एंजल्समध्ये झाला. २००२ मध्ये आलेल्या जनरल हॉस्पिटल या चित्रपटातून तिने तिचं फिल्म करिअर सुरू केलं. मेगनने आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि थिएटर या विषयांमध्ये शिक्षण घेतलं आहे. अर्जेंटीनाच्या अमेरिकी दुतावासात तिने इंटर्नशिपही केली. सिनेमात काम करण्याआधी ती फ्रिलान्स कॅलिग्राफीही करत होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने