रूडला पराभवाचा धक्का

मेलबर्न : नॉर्वेचा द्वितीय मानांकित कॅस्पर रूडला अमेरिकेच्या जेन्सन ब्रुक्सबीकडून चार सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी (ता. १९) झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.



ब्रुक्सबी याने ६-३, ७-५, ६-७ (४) आणि ६-२ अशी चार सेटमध्ये कॅस्पर रूडवर मात केली. जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या ब्रुक्सबीची ही पहिलीच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.ब्रुक्सबी याने बॅकहॅन्डचा अत्यंत उत्कृष्ट वापर करत पहिल्या सेटपासूनच रूडला जेरीस आणले. ड्रॉप शॉट आणि बॅकहँडचा अत्यंत लीलया वापर करत त्याने पहिले दोन सेट जिंकले. दुसरा सेट संपल्यावर उकाड्याने हैराण होऊन रूडने मेडिकल टाइम आऊट घेतला.तिसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी स्थिती असताना, रूडने त्याची सर्व्हिस भेदत सामन्यात पुनरागमन करायचा प्रयत्न केला. रूडने ३-५ , अशा पिछाडीवरून तिसरा सेट टायब्रेकमध्ये ७-६ (४) असा जिंकला. चौथ्या सेटमध्ये ब्रुक्सबी याने रूडला संधीच दिली नाही. त्याने चौथ्या सेटमध्ये ३-० अशी आघाडी घेत आपला इरादा पक्का केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने