शास्त्रींचा मृत्यू अन् पाच अनुत्तरीत प्रश्न

दिल्ली:  भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे. लाल बहादूर हे शांती पुरुष म्हटल्या जायचे.शास्त्रीजी वैयक्तीक जितके शांत होते तितकेच देशासाठी ते 'बहादूर' होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आकस्मिक निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले.शास्त्रींनी त्यांच्या कार्यकार्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे कामे केली. जय जवान, जय किसान असा नारा दिला पण ताश्कंद करार हा ऐतिहासिक निर्णयासाठी ते विशेष ओळखले जातात.ज्या दिवशी ताश्कंद करार झाला त्याच दिवशी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.खरच शास्त्री यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता? यासारखे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहे ज्याची उत्तरे अजूनही मिळाली नाही. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.

शास्त्रींना खरंच हार्ट अटॅक आला होता?

1965 च्या भारत-पाक युद्धानंतर ताशकंदमध्ये करार करण्यात आला. 10 जानेवारी 1966 ला ताशकंद मध्ये पाकिस्तानसोबक शांतीचा करार करण्यात आला.मात्र करारानंतर जवळपास 12 तासानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पोस्टमार्टमही करण्यात आलं नाही त्यामुळे हा खरंच हार्ट अटॅक होता का? हा आजही प्रश्व उपस्थित केला जातो.



शास्त्रींजींचं पोस्टमार्टम का केलं नाही?

11 जानेवारी 1966 ला लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू हार्ट अटॅकनी झाल्याचं जग जाहीर झालं. मात्र त्यांचं ना ताश्कंदला पोस्टमार्टम करण्यात आलं ना भारतात.त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याची अधिकृत माहिती अजूनही कुठेही नाही. त्यामुळे शास्त्रींजींचं पोस्टमार्टम का केलं नाही? हा प्रश्न आजही विचारला जातो.

शास्त्री यांच्या रुममध्ये फोन आणि डोअर बेल का नव्हती?

या करारानंतर रात्री 8 वाजता रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोशिगिन यांनी एक रिसेप्शन दिले. त्यानंतर 11 वाजता ते डाचा हे पोहचले जिथे ते थांबले होते.शास्त्रीजी ज्या रुममध्ये थांबले होते तिथे ना फोन होता ना डोअर बेल. एका देशाच्या पंतप्रधानाच्या खोलीत डोअर बेल आणि फोन नसणे ही सामान्य गोष्ट नव्हती.

शास्त्रीच्या निर्णयावर घरचे नाराज होते?

शास्त्रीजीनी आपल्या वैयक्तीक सचिव जेएन सहाय यांना ताश्कंद करारावर भारतातून काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यास सांगितले होते.रिसेप्शन पार्टीतून आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी फोनवर बातचीत केली आणि त्यांना ताश्कंद कराराविषयी सांगितले. तेव्हा त्यांच्या मुलीने या करारावर नाराजी दाखवली.जेव्हा शास्त्रीजींनी पत्नी ललितासोबत बोलण्याची इच्छा दर्शवली पण त्या फोनवर बोलायला आल्या नाही.शास्त्रीजींच्या या करारावर खरंच घरचे नाराज होते? तर बाकी संपूर्ण देश या निर्णयाविरोधात राहणार अशी शास्त्रीजींना भीती होती का?

शास्त्रीजींची खरंच हत्या झाली होती?

जेव्हा शास्त्रींजींचं शरीर भारतात आणण्यात आलं तेव्हा त्यांची पत्नी ललिता शास्त्रींनी पार्थिव शरीर निळा रंगाचं झाल्याने हा सामान्य मृत्यू नाही तर त्यांनी विष देण्यात आल्याचा आरोप केला.याशिवाय त्यांच्या दोन मुलांना त्यांच्या डोक्यावर पांढरा मार्क आणि त्यांच्या पोटावर दोन कट मार्क दिसले होते.त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे आजवर कळले नाही. यानंतर शास्त्रींच्या घरच्यांनी त्यांच्या पोस्टमार्टमचीही मागणी केली होती मात्र पोस्टमार्टम करण्यात आले नाही. त्यामुळे ही हत्या होती का? हा आजही प्रश्व उपस्थित केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने