तुमची कामगिरी चांगली नाही; ४५२ फ्रेशर्सना विप्रोकडून नारळ

मुंबई: आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचं हत्यार उपसलं आहे.सर्वाधिक कर्मचारी कपातीची घोषणा दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांकडून करण्यात आली आहे. शुक्रवारी गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने १२ हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.त्यानंतर आयची क्षेत्रातील दिग्गज कंपनीने विप्रोनेही कर्मचारी कपात केली आहे. तुमची कामगिरी चांगली नसल्याचे कारण पुढे करत विप्रोने ४५२ फ्रेशर्सना कामावरून काढत घरचा रस्ता दाखवाल आहे.प्रशिक्षण देऊनही हे कर्मचारी वारंवार खराब कामगिरी करत असल्याने ही कर्मचारी कपात केल्याचे कंपनीकडून नमुद करण्यात आले आहे. फ्रेशर्सने कंपनीने ठरवून दिलेल्या मानांकनानुसार काम करावे हीच आमची अपेक्षा आहे.दरम्यान, या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या टर्मिनेशन लेटरमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणासाठी करण्यात आलेला प्रति कर्मचारी साडेसात हजारांचा खर्च माफ केला आहे.



दिग्गज कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरूच

जगभरात आर्थिक मंदींची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच गोष्टीची दखल घेत जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जगभारातील १२ हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.याशिवाय अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टनेदेखील 25,000 हून अधिक कर्मचार्‍यांची कपात जाहीर केली आहे. तसेच स्विगीने ३८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने