जगभरात 'पठाण' चा उदो उदो...पण बांग्लादेशात मात्र प्रदर्शनास होतोय विरोध..जाणून घ्या कारण

मुंबई: शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' सिनेमानं जिथे एकीकडे भारतात ५०० करोडचा बिझनेस केला तिथे जगभरात हजार करोडचं कलेक्शन केलं आहे.यादरम्यान घोषणा झाली होती की 'पठाण' बांग्लादेशमध्ये २४ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे,पण तेवढ्यात बांग्लादेशी अभिनेता डिपजॉलनं यावर आक्षेप घेतल्याचं समोर आलं. त्यानं हिंदी सिनेमा आणि त्याच्या गाण्यांना 'अश्लील' म्हटलं आहे.शाहरुख खानचे बांग्लादेशी चाहते खूपच उत्साहित होते की 'पठाण' २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या देशात रिलीज केला जाणार आहे,पण तिथली फिल्म इंडस्ट्री मात्र या गोष्टीनं एकदम नाराज दिसत आहे.



काही दिवांपूर्वी बांग्लादेशच्या सूचना मंत्रालयानं देशात हिंदी सिनेमांना रिलीज करण्यासाठी परवानगी दिली होती. सिनेमाशी संबंधित १९ संघटनांसोबतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर सहमती दर्शवत दरवर्षी १० हिंदी सिनेमे बांग्लादेशातील सिनेमागृहात रिलीज केले जातील असं सांगितलं होतं.बांग्लादेशी सिनेमांत प्रामुख्यानं खलनायकी भूमिका साकारणारा अभिनेता डिपजॉल मात्र या निर्णयावर नाराज झाला आहे.लोकल मीडियाशी बातचीत करताना या बांग्लादेशी अभिनेत्यानं सांगितलं की ,''बांग्लादेशी सिनेमा चांगल्या दर्जाचे सिनेमे बनवून प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम करत आहे. यामध्ये जर हिंदी सिनेमे रिलीज झाले तर याचा आमच्या सिनेमांवर मोठा परिणाम होईल''. डिपजॉल याचे स्वतःचे ५ सिनेमे रिलीजच्या जवळ आहेत.

अभिनेता पुढे म्हणाला की,''काही दिवासंपूर्वी बांग्लादेशी सिनेमांनी चांगलं परफॉर्म केलं होतं आणि प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात यशस्वीही ठरला होता, पण हिंदी सिनेमा आणि बांग्लादेशी सिनेमांचे एथिक्स जुळत नाहीत. हिंदी सिनेमात अश्लील गाणी आणि सीन्सचा भरणा असतो,जी आमची संस्कृती नाही''.डिपजॉलचं म्हणणं आहे की आम्ही बांग्लादेशात क्लीन आणि कुटुंब एकत्र बसून एन्जॉय करेल असे सिनेमे बनवतो. आमच्या सिनेमातून लोकांना चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांचे मनोरंजन होईल याकडे आम्हीअधिक लक्ष देतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने