तुर्की-सीरियानंतर चीनमध्ये भूकंप! बसला ७.३ रिश्टर स्केलचा हादरा

चीन : सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाच्या दरम्यान आज सकाळी चीन आणि ताजिकिस्तान सीमेवर ७.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमध्ये गुरुवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ८:३७ वाजता शिनजियांगमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप आणि पूर्व ताजिकिस्तानमध्ये ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला.चीनचे भूकंप नेटवर्क केंद्र (CENC) ने उइगर स्वायत्त क्षेत्रात भूकंप झाल्याचे सांगितले आहे, तर युएस जिओलॉजिकल सर्वे ने ताजिकिस्तान मध्ये आलेल्या भूकंपाबद्दल माहिती दिली आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये.

USGS च्या अंदाजानुसार, ताजिकिस्तानमध्ये ज्या भागात भूकंप झाला तो भाग पामीर पर्वताने वेढलेला आहे. अशा परिस्थितीत तेथे भूस्खलनही होऊ शकते, परंतु त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता कमी आहे. कारण या भागात लोकसंख्या खूपच कमी आहे. मात्र, चीनमधील परिस्थितीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.



तुर्की-सीरिया भूकंपात किती लोकांचा मृत्यू?

गेल्या आठवड्यात, ७.८ तीव्रतेचा भूकंप आणि त्याच्या आफ्टरशॉकमुळे तुर्कीमध्ये जीव गमावलेल्या लोकांची संख्या ४१,०२० झाली आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये एकूण ५८०० लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे या आपत्तीमुळे या भागात सुमारे ४६८२० लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीत गंभीर जखमींचा उल्लेख नसल्याने येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा ५०००० पेक्षा जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने