थोरातांच्या नाराजीबाबत नाना पटोले काय म्हणाले?

मुंबई: राज्याच्या राजकारणत चर्चेचा विषय ठरलेली नाशिक पदविधरची निवडूक पार पडली. या निवडणूकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळाला. मात्र या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते.यांनंतर काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी काल आपली भूमिका मांजताना पक्षातील नेत्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केल्याचे बोलले जात आहे यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पटोले म्हणाले की, थोरातांनी काय पत्र लिहीलं हे मला माहिती नाही. बाळासाहेब थोरातांनी पत्र लिहीलं असेल तर त्यावर उत्तर देता येईल. त्यांनी असं कुठलही पत्र लिहीलं नसेल असं मला वाटतं असंही पटोले म्हणाले.पुढे बोलताना पटोले म्हणाले की, थोरात काय बोलतात ते मला माहिती नाही. ते आमचे नेते आहेत. या सगळ्या प्रकरणावर पक्षाच्या पातळीवर चर्चा व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी १३ तारखेला प्रदेश कार्यकारणीची बैठक ठेवली आहे. त्यावेळी घरातील प्रश्न घरात सोडवण्याचा प्रयत्न असेल असे पाटोले म्हणाले.




बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीतील माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे.याबद्दल बाहेर बोललं पाहिजे असं नाही या मताचा मी आहे. म्हणून याबाबत मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. याबतीत पक्ष आणि मी मिळून योग्य त्या प्रकारे निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही.गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार असून आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे, असेही थोरातांनी यावेळी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने