भाजपाने दिलेली वचनं पाळली नाहीत; विरोधी पक्षाचं कानात फुलं माळून अजब आंदोलन

कर्नाटक: कर्नाटक विधिमंडळातले काँग्रेस नेते अर्थसंकल्पाच्या दिवशी फुलं माळून आले होते. या प्रकाराला त्यांनी किवी मेले हुवा कॅम्पेन असं म्हटलं आहे. भाजपाने जनतेला मागच्या अर्थसंकल्पात दिलेली वचनं पाळली नाहीत, म्हणून आपण असा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज त्यांच्या कार्यकाळातला दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पापूर्वी विरोधी पक्षनेते सिद्धरमैय्या आणि इतर काँग्रेस नेते यांनी कानात फुलं टाकून सभागृहात प्रवेश केला आणि आपला निषेध नोंदवला.



सिद्धरमैय्या म्हणाले, "आणखी एक बजेट कसं लोकांना फसवण्यासाठी आणण्यात येत आहे, याचं प्रतिक हे फूल आहे. " तसंच भाजपा आपलं कोणतंही वचन या वर्षीच्या अर्थसंकल्पातून पूर्ण करत नाहीये, असंही ते म्हणाले.राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस भाजपावर सातत्याने निशाणा साधत आहे. काँग्रेसकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. काँग्रेसने बोम्मई यांच्या सरकारला ४० टक्के कमिशनचं सरकारही म्हटलं आहे. त्यानंतर काँग्रेसने PayCM असं कॅम्पेनही सुरू केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने