स्वतःला गुजरातची सून म्हणवून घ्यायच्या इंदिरा गांधी, जाणून घ्या लव्ह स्टोरी

दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्य होण्याच्या काळात देशात अनेक प्रेमकथा जन्म घेत होत्या. त्याचाच एक भाग होता देशाची आयर्नलेडी पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोझ गांधी यांच्या प्रेमकहाणी विषयी आज जाणून घेऊयात.इंदिरा-फिरोझ यांच्या प्रेमकहाणीत स्वतंत्र्याची चळवळ खुप महत्त्वाचा भाग आहे. 1930 साल उजाडलं होतं. नवं रक्त असल्यामुळे साहजीकच फिरोझही स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षित झाले. त्यात एक चेहरा होता फिरोझ गांधी यांचा. ते गुजरातमधील असून पारशी कुटुंबातील होते.

तो काळ स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांसाठी खडतर होता तसाच तो त्यांच्या मुलांसाठीही होता. एकीकडे देशाचे होणारे पंतप्रधान पंडीत नेहरू इंग्रजांविरूद्ध देशात एकजूट होण्यासाठी लढत होते तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी कमलाजी ही चळवळीत अग्रेसर होत्या. त्यामुळे कोवळ्या वयातील इंदिराजींना त्यांचा फार कमी सहवास लाभला.  6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि मिठाचा कायदा मोडला. त्यानंतर 14 एप्रिलला पंडित नेहरुंना अटक करण्यात आली. नेहरुंना अटक केल्यामुळे देशभरात आंदोलन चिघळलं महिला उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. नेहरू यांच्या अटकेनंतर कमलाजींचा आंदोलनात सहभाग वाढला.

त्यावेळी फिरोझही फक्त कमला यांच्या आंदोलनांचे निरीक्षण करत होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात कमला जखमी झाल्यानंतर यांचे रक्षण करण्यासाठी फिरोझ धावून गेले आणि येथेच पहिल्यांदा फिरोझ आणि नेहरु घराण्याचा प्रत्यक्ष संबंध आला. याच काळात फिरोझ यांनीही इंदिरा आपल्याला आवडत असल्याचं कमला यांना सांगितलं. यावेळी मात्र, कुठलाही त्रागा न करता कमला यांनी फिरोझ यांचं म्हणणं ऐकलं. फिरोझ यांची हीच भावना कमला यांनी इंदिरा यांना कळवली. ‘फिरोझला तू आवडतेस’ असं कमला इंदिराजींना म्हणाल्या. पण इंदिरा यांना फिरोझमध्ये काही रस नसल्याचं कमला यांना दिसलं आणि इंदिरा अजून खूप लहान आहे, असं उत्तर त्यांनी फिरोझला दिलं.



रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये 1933 मध्ये असताना इंदिरा सोळा वर्षांची होती. याच काळात फिरोझ गांधी यांनी इंदिरा यांना पत्र लिहून तिला आणखी एकदा लग्नाची मागणी घातली होती. त्याला उत्तर म्हणून मला तुझ्याशी किंवा इतर कोणाशीही लग्न करण्याचा विचार नाही. असं इंदिरा यांनी फिरोझला स्पष्टपणे कळवलं होतं.इंदिरांच्या सोळाव्या वर्षीच फिरोझ यांनी तिला लग्नाची मागणी घातली होती. असे असले तरी इंदिरा फिरोझला टाळतच आल्या होत्या. मात्र, पॅरिसमधील साक्रेकरच्या चर्चसमोर फिरोझच्या आयुष्यात इंदिराचा प्रवेश झाला. इंदिरा यांनी फिरोझ यांना पॅरिसमधील साक्रेकरच्या चर्चसमोर होकार दिला. दोघांचीही मनं जुळल्यानंतर दोघेही पॅरिसमध्ये मनसोक्त फिरले होते.

नेहरूंचा लग्नाला विरोध

इंदिराजींनी होकार दिला खरा पण खरी परिक्षा तर तेव्हा होती जेव्हा वडील पंडित नेहरु यांची परवानगी घेणे. फिरोझ आणि इंदिरा लग्न करण्यावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. पण, लेकीच्या हट्टापुढे ते जास्तवेळ नकार देऊ शकले नाहीत.लग्नाबद्दल बोलताना संपूर्ण देश आमच्या लग्नाच्या विरोधात आहे, असं इंदिरा यांनी म्हटलं होतं. दरम्यान, इंदिरा-फिरोझ यांनी 16 मार्च 1942 रोजी रामनवमीच्या दिवशी लग्न केलं.इंदिरा गांधी जेव्हा कधी गुजरातमध्ये प्रचारासाठी जात तेव्हा त्या डोक्यावरून साडीचा पदर खाली पडू द्यायच्या नाहीत. त्या नेहमीच आपण गुजरातची सून असल्याचे अभिमानाने सांगायच्या. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने