...तर आम्ही पुन्हा एकटे; आंबेडकर ठाकरेंची साथ सोडणार?

मुंबई:   निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के बसत आहेत. अशातच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.एका पत्रकाराने शिवसेनेचं काँग्रेस आघाडीसोबत मनोमिलन राहिल्यास? असा सवाल उपस्थित केला असता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तर आम्ही पुन्हा एकटे, असे म्हणत इशारा दिला आहे.



ठाकरे गटाचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनोमिलन राहिल्यास आपण पुन्हा एकटे लढू. अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत आंबेडकर महाविकासआघडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन पक्ष यांनी आंबेडकरांना पाठिंबा देण्याची विनंतीदेखील केली नाही. इतकेच नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वचिंतची आम्हाला गरज नाही असं विधान केलं होतं. त्यामुळे आंबेडकर दुखावले गेलेत. अशी माहिती त्यांनी स्वतः दिली.त्यामुळे आंबेडकरांनी ठाकरेंना सांगितल की त्या दोघांची भूमिका स्पष्ट करावी नाही तर आम्ही एकटे वाटचाल करायला मोकळे. असा सूचक इशारा दिला.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर?

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन केलं तर? असा सवाल उपस्थित केला असता. आम्ही पुन्हा एकटे अशा शब्दात ठाकरेंना इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने