गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेत्याची घणाघाती टीका

बुलढाणा : रविकांत तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना न्यायालयानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला असून तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची अकोला न्यायालयातून सुटका झालीये.दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. न्यायालयातून सुटका होताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये.गुलाबराव पाटील  हे गुवाहाटीला  शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवाल तुपकरांनी केलाय. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. उठसूठ कुणालाही फोन करत असतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय, असा घणाघाती हल्लाही तुपकरांनी केला.




रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. काल तुपकर बुलढाण्यात पोहोचले. त्यांचं कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोषात स्वागत केलं. यावेळी ते म्हणाले, गुलाबराव पाटील तुमचे घर काचेचे आहे. तुम्ही गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटलांना अनेकवेळा मंत्री केलं, त्या ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा इशाराही तुपकरांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने