'कोर्टानं राहुल गांधींना 'या' कारणामुळं ठरवलं दोषी'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा प्रयत्न करत राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केलाय.'गांधी परिवारानं दलित किंवा मागासवर्गीय लोकांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यावर गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून काँग्रेस सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांचाही अपमान केला, असा आरोप इराणी यांनी केला.केंद्रीय मंत्री म्हणाल्या, 'राहुल गांधी संसदेत पंतप्रधानांबाबत अपमानास्पद शब्द वापरतात आणि त्यांच्यावर आरोप करतात. परंतु, ते स्वतःच्या विधानाची सत्यता सिद्ध करू शकत नाहीत. कोर्टानं राहुल गांधींना एका व्यक्तीचा अपमान केल्याबद्दल नाही तर संपूर्ण समाजाचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवलंय.'



गांधी घराण्यानं आजपर्यंत पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. पंतप्रधान मोदींवरील सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना कमी करता आलं नाही. राहुल गांधींची मानसिक स्थिती खराब झालीये म्हणून ते लंडनमध्ये जाऊन खोटं बोलत आहेत, असाही घणाघात त्यांनी राहुल गांधींवर केला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी यापूर्वी स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना मूकबधिर म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने