"निर्ढावलेल्या, मग्रूर मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा..." ; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा!

कोल्हापूर: छत्रपती संभाजी राजे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी आक्रमक ट्विट केले आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रातील भोंगळ व्यवस्थेचा छत्रपती संभाजी राजे यांनी पर्दाफाश केला आहे.राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरी देखील परिस्थिती जैसे थे आहे. इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.



मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा संवेदनाहीन व मग्रूर मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा स्वराज्य यामध्ये उतरेल, असा इशारा देखील संभाजी राजे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.छत्रपती संभाजी राजे यांनी धाराशिवचा दौरा केला त्यावेळी खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आरोग्य सुविधेची वानवा आणि रुग्णालयांची दुरावस्था झाल्याचा आरोप केला होता. संभाजीराजे यांनी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या भूम शहरातील शासकीय रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी रुग्णालयाची दुरावस्था पाहून आरोग्य विभागाचे वाभाडे काढले होते. ग्णालयात डॉक्टर आणि नर्सची कमतरता, रुग्णालय अस्वच्छ असून अनेक वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याचे पाहून संभाजी राजे संतापले होती. याप्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप व्यवस्था जैसे-थे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने