चीनने 53 देशांमध्ये 102 गुप्त पोलिस ठाणे उभारले; जगासमोर मोठं संकट

 बीजिंगः जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये चीनने तब्बल १०२ पोलिस ठाणे उभारल्याची माहिती आहे. त्यामुळे एक नवं संकट चीनमुळे जगासमोर उभं राहात आहे. हे गुप्त पोलिस ठाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकेस्पेन येथील मानवाधिकार ग्रुप सेफकार्डने सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा याबाबत खुलासा केला होता. यामध्ये सांगितलं होतं की, हे पोलिस स्टेशन पाच खंडांमधून ऑपरेट होत आहेत.दायक ठरण्याची शक्यता व्यक्त होतेय.रिपोर्टनुसार, ५३ देशांमध्ये जवळपास १०२ असे पोलिस स्टेशन आहेत. या पोलिसा ठाण्यांचे नेटवर्क चीनमधील पब्लिक सिक्योरिटी ब्युरोकडून २०१६मध्ये सुरु करण्यात आलेलं होतं.



माहिती गोळा करणे, ऑपरेशन्स हाताळणे आणि दडपशाही करणे ही कामं या ठाण्यांना दिलेली आहेत. चीनविरोधी आवाज संपुष्टात आणण्यासाठी कारवाया करणे, हे यांचं काम असून त्यामुळे इतर देशांना धोका निर्माण होत असल्याचं सेफकार्डने सांगितलं आहे.एका रिपोर्टनुसार २०१८मध्ये चिनी कम्युनिस्ट पार्टीने आपला परदेशी चिनी विभाग UFWDमध्ये विलिन केला. चिनी लोकांना परदेशात गुप्तचर म्हणून नियुक्ती करण्याच्या हेतूने असं केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.परदेशात चीनसाठी काम करणारे हे लोक दुकाने, रेस्टॉरंट, मॉल किंवा अपार्टमेंटमध्ये राहून त्यांचं काम करतात. विशेष म्हणजे चिनी दूतावासाशी ते कुठलाही संबंध ठेवत नाहीत.सीओपीएस हे मुख्यत्वे करुन परदेशातील चिनी लोकांना गृहीत धरुन तयार केलेले असले तरी ते जगभरातील अनेक देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने