फडणवीसांनी काल राजकीय धमकी दिलीय; आदित्य ठाकरेंचं मिश्कील वक्तव्य

मुंबई: मुंबईत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आमदार आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळालं होता. आता या चर्चेनंतर आता आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजकीय धमकी दिली असल्याची मिश्कील वक्तव्य केलंय.आज आदित्य ठाकरेंना पत्रकारांने सध्या तुमच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे आणि फडणवीसांनी देखील लग्नासाठी पुढकार घेतला आहे का म्हणत प्रतिक्रिया विचारली. याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अरे बाबा कालपासून, काल त्यांनी राजकीय धमकी दिली आहे. इतरांना वेगळी असते. पण काल गंमत-जंमत चाललेली, असं मिश्किल उत्तर आदित्य ठाकरे यांनी हसून दिलं.



काल विधानभवनात काय झालं

काल सभागृहात बच्चू कडू आपला मुद्दा मांडताना म्हणाले की, "लग्न कामगार आहे म्हणून केलं पण आता लग्न तुटलं तर त्याला कोण जबाबदार आहे? सरकारनं याची जबाबदारी घेतली पाहिजे. याच्यासाठी काही धोरण आखणार आहात का? हा मूळ प्रश्न आहे"कडू यांच्या या विधानावर मिश्किल टिप्पणी करताना फडणवीस म्हणाले, "लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटल्यानंतर त्याला सांभाळायची जबाबदारी सरकारची. पण आपण जी सूचना केली आहे ती जरुर तपासून पाहता येईल तसेच त्यावर काही धोरण तयार करता येईल का ते पाहता येईल"

फडणवीस पुढे म्हणाले, "पहिल्यांदा तर बच्चू कडूंनी हा प्रश्न आदित्यजींकडं पाहुन विचारला होता का? सरकारनं लग्न लावायचं...त्यावर आदित्य ठाकरे आपल्या जावेवरुनचं म्हणाले, "नको नको" मग फडणीस मिश्किलपणे पुन्हा म्हणाले, "सरकार याची जबाबदारी घ्यायला तयार आहे"फडणवीसांच्या या टिप्पणीवर आदित्य ठाकरे पुन्हा म्हणाले की, "ही काही राजकीय धमकी आहे का? की तुम्ही आमच्यासोबत बसा अन्यथा तुमचं लग्न लावून देऊ" आदित्य ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर सभागृहात एकच हशा पिकला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने