मोठी बातमी! जाकीर नाईक भारताच्या हाती लागण्याची शक्यता; ओमानमध्ये होणार मोठं ऑपरेशन?

 नवी दिल्लीः कट्टरपंथी इस्लामिक उपदेशक जाकीर नाईकला ओमानवरुन भारतामध्ये आणलं जावू शकतं. नाईक हा २३ मार्चपासून ओमान दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.भारतीय गुप्तचर यंत्रणा ओमान येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यासंबंधीचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने 'न्यूज १८ हिंदी'ने दिले आहे. नाईक याला ओमानमध्ये दोन व्याखानं देण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याचे पहिले व्याख्यान 'कुरान अ ग्लोबल नीड' या विषयावर असणार आहे. ओमानच्या धर्मविषयक काम करणाऱ्या मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर दुसरं व्याख्यान पैगंबरांवर असणार आहे..



ओमानमधील भारतीय दुतावास नाईकला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्थानिक कायद्यांतर्गत त्याला अटक करुन नंतर भारतात पाठवण्यासाठी तेथील एजन्सींच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाने ओमानी राजदूताकडे लावून धरले आहे.ओमानमधील भारतीय राजदूतानेही हा मुद्दा ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर मांडला आहे. झाकीर नाईक याच्यावर भडकाऊ भाषणे, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. या आरोपांतर्गत ईडी आणि एनआयएने त्याला वाँटेड घोषित केले आहे. तो २०१७मध्ये मलेशियाला पळून गेला आणि तेथील नागरिकत्व घेतले. यावेळी तो पकडला जाणार का? हाच प्रश्न आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने