आज पृथ्वीवरून थेट दिसणार ५ ग्रह चक्क एका रेषेत

मुंबई: सुर्यमालेत सतत फिरत असणारे ग्रह आपापल्या वेगात आणि ऑरबिटमध्ये फिरत असतात. त्यांची गती, आकार आणि जागा वेगवेगळ्या असल्याने त्यांना सलग बघता येणे हा अत्यंत दुर्मिळ योग समजला जातो. हा योग आज पृथ्वी वासियांना अनुभवता येणार आहे.मंगळवार २८ मार्च रोजी सुर्यमालेतले ५ ग्रह एका सरळ रेषेत दिसतील. सुर्यास्तानंतर हा दुर्मिळ योग पृथ्वीवरुन बघता येणार आहे.



सुर्या भोवती फिरणारे नऊ ग्रह आणि त्यांचे अनेक उपग्रह आपल्या सुर्यमालेत सतत फिरत असतात. प्रत्येकाची चाल, वजन, गती वेगवेगळी असते. त्यामुळे आकाशातली प्रत्येक ग्रहाची स्थिती वेगवेगळी दिसते. अशावेळी हे ग्रह एकत्र बघायला मिळणे ही खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे. ही दुर्मिळ घटना सूर्यास्तानंतरच दुर्बिणीने पाहता येते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते यात ५ ग्रहांपैकी शुक्र सर्वात तेजस्वी दिसण्याची शक्यता आहे. शिवाय बुध आणि गुरु स्पष्टपणे दिसू शकतात.या काळात मोठ्या सोलर सिस्टीम अंतरामुळे युरेनस स्पष्टपणे पाहणे कठीण होऊ शकते. तर मंगळ आणि चंद्र खूप जवळून दिसतील. २८ मार्च रोजी होणारी खगोलशास्त्रीय घटना ग्रेट प्लॅनेटरी अलाइन्मेंट म्हणून ओळखली जाते. यात ५ ते ६ ग्रह एकाचवेळी सुर्याच्या जवळ असतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने