आफ्रिकेतील जमिन दुभंगतेय? निसर्गाच्या इच्छेचा थरारक व्हिडीओ!

अफ्रिका: जगात जेव्हा काही विनाशकारी होतं. तेव्हा एका चांगल्या गोष्टीची सुरूवात होते. पूर्वीपासून हे असंच सुरू आहे आणि भविष्यातही तेच होणार आहे. याची सुरूवात आफ्रिकेतून झाली आहे. अफ्रिका खंडातील एका ठिकाणी जमिनीला भेग पडली असून ती दरवर्षी थोडी थोडी वाढत आहे.2018 मध्ये केनियाची राजधानी नैरोबीपासून सुमारे 142 किमी अंतरावर असलेल्या नारोक या छोट्याशा गावात अशाच प्रकारचे भगदाड दिसले होते. मुसळधार पावसानंतर येथे पडलेल्या भेगा वाढतच होत्या.



हि नैसर्गिक आपत्ती पावसामुळे असू शकते. परंतु भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे की जमिनीच्या आतील कंपनांमुळे वर एक दरी तयार झाली आहे. ही दरी दरवर्षी 7 मिमी इतकी पसरत आहे.आफ्रिकन महाद्वीपचे दोन भागात विभाजन झाले तर नवीन महासागर निर्माण होईल. त्यामुळे भूपरिवेष्टित असलेल्या अनेक देशांनाही समुद्रकिनारे असण्याची अपेक्षा आहे.सध्या आफ्रिका खंडात असे 6 देश आहेत जे सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले आहेत. मात्र या जमिन विभागणीनंतर 6 देशांना एक महासागर मिळणार आहे. या देशात रवांडा, युगांडा, काँगो, बुरुंडी, मलावी, झांबिया यांचा तर केनिया, टांझानिया आणि इथिओपियामध्ये प्रत्येकी दोन प्रदेशांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने