'मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन'; भाजपच्या सभेत CM बोम्मईंचा मोठा दावा

कर्नाटक: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर  पुन्हा सत्तेत परतणार असल्याचा दावा केलाय.मी कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येईन, असं बोम्मई यांनी सभेत सांगितलंय. देवानं मला कर्नाटक मातेची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी प्रामाणिकपणे काम केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



उत्तर कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील हुनागुंड इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'मी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यामुळं राज्याच्या दरडोई वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे.'12 व्या शतकातील समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या 'काम हीच पूजा' आणि सामाजिक समतेचा मार्ग आपण अवलंबत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.बोम्मई पुढं म्हणाले, "मी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समुदायांचं सहकार्य मागितलं आहे. बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत." यावेळी बोम्मईंनी सभेत मी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येईन, असा दावा केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने