आरबीआयने जारी केला आदेश; बँकेच्या शाखा 31 मार्चपर्यंत राहतील सुरु, कारण...

 दिल्ली  भारतातआर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 31 मार्च रोजी संपते. बँकांच्या सर्व शाखा 31 मार्चपर्यंत सुरू राहतील असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना दिला आहे.रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की त्यांच्या सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात, केंद्रीय बँकेने 21 मार्च रोजी एक निवेदन जारी केले आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 या महिन्याच्या 31 तारखेला संपणार आहे. म्हणूनच आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, या महिन्यातील सरकारशी संबंधित सर्व व्यवहार 31 मार्चपर्यंत निकाली काढावेत. यासाठी त्यांनी बँकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा उघडण्याचे आदेश दिले आहेत.मात्र, या दिवशी बँकांमध्ये ग्राहकांसाठी कोणतेही काम होणार नाही. मात्र, धनादेश बँकेच्या शाखेत जमा करता येतो. तसेच, या दिवशी ऑनलाइन बँकिंगही सुरू राहणार आहे. 31 मार्चनंतर 1 आणि 2 एप्रिलला सलग दोन दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.



RBI चे काय निर्देश आहेत :

"सर्व एजन्सी बँकांनी 31 मार्च 2023 रोजी सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी त्यांच्या नियुक्त शाखा खुल्या ठेवाव्यात," असे आरबीआय बँकेच्या पत्रात म्हटले आहे.त्यात पुढे म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरू राहतील.तसेच, 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी आरबीआयचे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने