आत्ताच उरकवा सगळी कामं, एप्रिल मध्ये असेल १५ दिवस बँक बंद

मुंबई: एप्रिल महिन्यात पूर्ण देशात जवळजवळ १५ दिवस बँक बंद असणार आहे, कर्मचाऱ्यांसाठी कितीही छान गोष्ट असली तरी आपल्यासाठी नक्कीच नाही, एप्रिलमध्ये महावीर जयंती, ईद, गुड फ्रायडे, महावीर जयंती असे अनेक सण आहेत, ज्यामुळे देशात जवळजवळ १५ दिवस बँक बंद असणार आहे. त्यामुळे यंदा बँकेच्या कामांची यादी ही लिस्ट बघूनच करा.

एप्रिल २०२३ मधल्या सुट्टींची यादी :

- १ एप्रिल २०२३ : आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे काही राज्ये वगळता बँका बंद राहतील. 

- ४ एप्रिल २०२३ : महावीर जयंती 

- ५ एप्रिल २०२३ : बाबू जगजीवन राम जन्मदिवस यानिमित्त हैद्राबादमध्ये सुट्टी असेल

- ७ एप्रिल २०२३ : गुड फ्रायडे 

- १४ एप्रिल २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि वैशाखी निमित्त

- १५ एप्रिल २०२३ : हिमाचल दिवस आणि बंगाली नववर्ष दिवस निमित्त त्या त्या राज्यात बँक बॅंड असेल

- १८ एप्रिल २०२३ : शब-ए-कदर निमित्त जम्मू आणि काश्मीरमध्ये बँक बंद असेल

- २१ एप्रिल २०२३ : रमजान ईद (ईद-उल-फित्र)

- २२ एप्रिल २०२३ : रमजान ईद, चौथा शनिवार



दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार मुळे

- २ एप्रिल : रविवार

- ८ एप्रिल : दुसरा शनिवार 

- ९ एप्रिल : रविवार 

- १६ एप्रिल : रविवार 

- २२ एप्रिल : चौथा शनिवार

- २३ एप्रिल : रविवार 

- ३० एप्रिल : रविवार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने