राहुल गांधी ठरले दोषी! कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

सूरत : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं मानहानी प्रकरणात दोषी ठरवलं आहे, यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा राहुल गांधी यांना मोठा झटका मानला जात आहे. मोदी या आडनावावरुन त्यांनी टिप्पणी केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.



मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी टिप्पणी केली होती. त्यामुळं त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत कोर्टात आज सुनावणी होती, या सुनावली हजेरी लावण्यासाठी राहुल गांधी सकाळीच दिल्लीहून विमानानं सूरतकडे रवाना झाले होते. सूरतमध्ये पोहोचताच त्यांच्याविरोधात कोर्टाचा निकाल आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने