'मुख्यमंत्री म्हणून आम्ही 'त्यांनाच' पाहात आहोत, भाजपकडून कोणताच दगाफटका होणार नाही'

सातारा : सध्यातरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून, आगामी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांनाच पाहात आहोत. पुढचं पुढं पाहू, याबाबत भाजपकडून कोणताही दगाफटका होणार नाही, असा विश्वास शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.शिवसेनेचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर  साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी नियोजन समितीचा आढावा घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार उपस्थित होते.



आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच  असतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी वक्तव्य केलं आहे. त्यावर क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलं. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम होती घेतले असून, त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेला चांगले वातावरण असून, आगामी काळात सातारा शिवसेनेचा जिल्हा होऊ शकतो. जागा वाटपचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना सातारा लोकसभेसाठी  सक्षम उमेदवार देईल, असंही म्हणाले.

'व्याख्याने देऊन पक्ष वाढत नाही'

आगामी काळात नितीन बानुगडे पाटील यांना शिवसेनेत घेतले जाणार का, या प्रश्नावर राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘व्याख्याने देऊन पक्ष वाढत नाही. जिल्ह्याला बानुगडे यांच्या व्याख्यानाची गरज नाही. कारण आज आमच्याकडे अनेक शिलेदार आहेत.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने