माधुरीची ऐश्वर्यासोबत झालेल्या तुलनेवर जया बच्चनचा प्रचंड संताप! किती...

मुंबई:  हॉलिवूडच्या प्रसिद्ध शो 'द बिग बँग थिअरी'वर गदारोळ झाला आहे. या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची तुलना खूपच खराब पद्धतिने करण्यात आली आहे.नेटफ्लिक्सच्या 'द बिग बँग थिअरी' ही वेब सिरिज सध्या चर्चेत आहे. या वेबसिरिजमध्ये माधुरी दीक्षितला 'कुष्ठरोगाने ग्रस्त सेक्स वर्कर' म्हटलं आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सच्या 'द बिग बँग थिअरी' या सिरिजच्या निर्मात्यांचा वेब सिरिज अडचणी वाढल्या आहे.



या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये  माधुरी दीक्षितसाठी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते, त्यानंतर OTT प्लॅटफॉर्म Netflix ला कायदेशीर नोटीस मिळाली होती.आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.'द बिग बँग थिअरी'च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये एक सीन आहे जिथे (जिम पार्सन्स) ऐश्वर्या राय बच्चनची तुलना माधुरी दीक्षितशी करतो. शेल्डन म्हणतो, 'ही ऐश्वर्या राय बच्चन आहे. मला वाटते ती गरिबांची माधुरी दीक्षित आहे. हे ऐकून राज (कुणाल नय्यर) रागावतो आणि म्हणतो, 'हे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? ऐश्वर्या ही देवी आहे. तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित ही 'लेपरस वेश्या' आहे.

कुणाल नय्यरच्या 'लेपरस प्रोस्टिट्युट' या वक्तव्यामुळे केवळ अभिनेत्रीच नाही तर तिचे सर्व चाहते आणि स्टार्सही संतापले. यावर जया बच्चन यांनीही नाराजी व्यक्त केलीत्या म्हणाल्या की, हा मुलगा म्हणजेच कुणाल नय्यर लहान आहे का? अतिशय अभद्र भाषा वापरली आहे. त्याला येड्याच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांनीही सांगायला हवं की आम्ही तुम्हाला सांगतो की हे शब्द ऐकून त्यांना कसं वाटतंय?तर दुसरीकडे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की मी अजून हा शो पाहिला नाही. पण असा आक्षेपार्ह शब्द वापरला गेला असेल तर त्यातून लोकांची घाणेरडी मानसिकता दिसून येते. त्यांना काय वाटतं हा विनोद आहें. त्याचवेळी दिया मिर्झानेही याला लाजिरवाणं म्हटलं आहे.अलीकडेच, राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी या संदर्भात OTT प्लॅटफॉर्म Netflix ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून हा शो काढून टाकण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने