सलमानचा बॉडीगार्ड होण्यापूर्वी शेरा काय करत होता?

मुंबई:  बऱ्याचदा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्यासोबत सतत सावलीसारखा असणाऱ्या शेराची गोष्ट अनेकांना माहिती नाही. सलमानचा अंगरक्षक म्हणून शेरावर चित्रपटही आला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. सलमानवर भावासारखं प्रेम करणाऱ्या शेराचा प्रवास मोठा कष्टाचा होता. एका मुलाखतीमध्ये त्यानं त्याविषयी सांगितलं होतं.सलमानचा बॉडीगार्ड शेरा हा आता एक मोठा सेलिब्रेटी झाला आहे. त्याचा सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येनं चाहतावर्ग आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सलमानवर जेवढे चाहते प्रेम करतात तितकचं जास्त प्रेम त्याच्या बॉडीगार्डवर म्हणजे शेराला देखील त्यांच्याकडून मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. शेराचं खरं नाव गुरमित सिंह जॉली असे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानचा सुरक्षारक्षक म्हणून शेराचा वर्षाला दोन कोटी रुपये घेतो.



महिन्याला त्याला मिळणारा पगार हा १६ लाख रुपये आहे. शीख परिवारातून आलेल्या शेराची प्रकृती ही लहानपणापासूनच सुदृढ राहिली आहे. त्याची १९८७ साली ज्युनिअर मिस्टर मुंबई, त्याच्या पुढच्या वर्षी मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवड झाली होती. त्यानंतर शेराच्या वडिलांनी त्याला मुंबईला बोलावून घेतले. तिथे तो गॅरेजमध्ये काम करत होता.१९९५ मध्ये सोहेल खाननं सलमान खानच्या विदेशी दौऱ्यासाठी शेराच्या कंपनीकडे सुरक्षेसाठी मागणी केली होती. त्यानंतर सोहेलनं शेराला विचारलं होतं की, भाईची साथ कधीही सोडणार नाहीस ना? शेरानं संमती दिली होती. एकदा सलमानला एका शोमध्ये जायचे होते त्यावेळी सोहेलनं शेराला सांगितले. तेव्हापासून तो नेहमीच सलमानच्या अवती भवती राहत असल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने