राहुल गांधींची खासदारकी रद्द आणि शशी थरूर खुश? सांगितलं सिक्रेट

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहे.राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून संकल्प सत्याग्रहाचे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकाही केली जात आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी, राहुल गांधींना न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली २ वर्षांची शिक्षा म्हणजे आशेचा किरण असल्याचं वक्तव्य केलं आहे.

मोदी आडनावावरून विधान केल्यामुळे राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर जामीनही दिला आहे. यावर बोलताना शशी थरुर म्हणाले कि, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची झालेली शिक्षा हा आशेचा किरण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे.पुढे बोलताना ते म्हणाले कि, आम्ही प्रादेशिक पक्षांना प्रत्येक राज्यात काँग्रेसचा एक प्रतिस्पर्धी मानत आलो. मात्र, या सध्याच्या परिस्थितीत ते सर्व पक्ष आमच्या बाजूने आले आहेत.



दिल्लीत अरविंद केजरीवाल, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यापूर्वी कधीही काँग्रेससोबत नव्हते, मात्र आता ते आमच्यासोबत आहेत, असंही शशी थरुर यांनी यावेळी नमूद केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.शशी थरूर पुढे म्हणाले की, विरोधकांची ही एकजूट भाजपविरोधातील आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. हा भाजपच्या कृतीचा निषेध असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. तर तिरुअनंतपुरमच्या खासदाराने राहुल गांधींवर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

कारण ललित मोदी किंवा नीरव मोदी दोघेही पळून गेलेत. परदेशात ते चैनीचे जीवन जगत आहेत. तो मागासवर्गीय आहेत आणि हा ओबीसी समाजावर हल्ला आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असंही शशी थरुर यांनी सांगितलं आहे.दरम्यान, राहुल गांधींवरील खटला कमकुवत आहे. आमच्याकडे चांगले वकील आहेत. चौथे मोदी म्हणजेच पूर्णेश मोदी हे सिद्ध करू शकत नाहीत की, त्यांना कोणत्याही प्रकारे लक्ष्य करण्यात आलं आहे.राहुल गांधी यांच्या वकिलाने न्यायालयीन कामकाजात सुरुवातीपासूनच त्रुटी असल्याचा युक्तिवाद केला आहे. राहुल गांधींनी आपल्या भाषणात त्यांच्यावर टीका केलेली नाही. आमदार पूर्णेश मोदी यांच्याऐवजी या प्रकरणात पंतप्रधान मोदींनीच तक्रारदार असायला हवे होते, असा खोचक टोलाही शशी थरुर यांनी यावेळी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने