जगावर पुन्हा नवं संकट! जाणून घ्या जीवघेण्या व्हायरसबद्दल सर्वकाही

दिल्ली: कोरोनानंतर जगावर आणखी एक संकट घोंगावताना दिसत आहे. जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) गुरूवारी इक्वेटोरियल गिनीमध्ये मारबर्ग व्हायरसमुळे सात नागरिकांता मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे, तसचे रक्तस्त्रावी तापाने (Hemorrhagic Fever) २० लोकांचा मृत्यू झाल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मारबर्ग व्हायरसच्या संक्रमनामुळे अन्य तीन लोकांचा मृत्यू झाला होता, हे रुग्ण देखील इबोलासारख्या एका गंभीर आजारीने पीडित होते.दरम्यान हा व्हायरस इबोला इतकाच घातक असल्याचे सांगीतले जात आहे. सध्या हा व्हायरस की-एनटेम प्रांतात पसरत असून याच ठिकाणी जानेवारी महिन्यात पहिल्यांदा या व्हायरसमुळे मृत्यूची घटना समोर आली होती.



सध्याची स्थिती काय आहे?

आफ्रीकेतील डब्लूएचओच्या अधिकारी डॉ. मतशीदिसो मोइती यांनी सांगितले की मारबर्ग व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तसेच या व्हायरसमुळे संभावित जीवीतहानी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न गरजेचे आहे.डब्लूएचओने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये व्हायरसच्या उद्रेकानंतर प्रयोगशाळेत ९ केसेस कंन्फर्म तर २० संभावित प्रकरणे समोर आल्याचं सांगितलं आहे.तसेच डब्लूएचओच्या एका अधिकाऱ्याने एएफपीला दिलेल्या माहितीनुसार २० संभावित प्रकरणांमध्ये रुग्णांमध्ये आजाराचे सर्व लक्षण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण कंन्फर्म झालेल्या रुग्णांच्या संपर्कात होते. मात्र या रुग्णांच्या शरिरातून सॅम्पल घेता येणं शक्य नव्हतं तसेच त्यांचा इलाज करणे देखील शक्य नव्हते. सध्या इक्वेटोरियल गिनीमधील चार प्रांतांपैकी तीनमध्ये या महामारीने हाहाकार उडवून दिला आहे.पूर्वी आफ्रीकेतील तंजानियाने मंगळवीरी व्हायरसमुळे पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे, तर शेजारचा देश युगांडा देखील हाय अलर्टवर आहे. दरम्यान डब्लूएचओने येत्या काही दिवसांत महामारीच्या नियंत्रणालाठी अतिरिक्त तज्ञ तैनात करणार असल्याचे सांगितले आहे.

आजाराची लक्षणं काय आहेत?

या आजाराचा प्रभाव रुग्णावर २१ दिवसांपर्यंत राहतो. व्हायरसमुळे होणारा हा आजार अचानक गोतो. यामध्ये ताप, डोकेदुखी आणि अचानक थकवा जाणवतो. तिसऱ्या दिवशी गंभीरपित्या डायरिया, पोट दुखी आणि उलटी होण्याचा त्रास सुरू होतो. गंभीर रक्तस्त्रावी लक्षण हे सुरूवातीच्या पाच ते सात दिवसांत विकसीत होतात. यामध्ये रुग्णांना अनेक ठिकाणहून रक्तस्त्राव होऊ शकतो. साधारणपणे लक्षणे दिसून आल्यानंतर आठ ते नऊ दिवसांनंतर रुग्णांचा मृत्यू होतो.हा व्हायरस कथित फाइलोव्हायरस कटुंबातील असून इबोलाचा देखील समावेश यामध्येच केला जातो. आफ्रिकेत यापूर्वी देखील अशा महामारींमुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे.

हा व्हायरस कसा पसरतो?

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार मारबर्ग संक्रमण झालेल्या लोकांचे रक्त, स्त्राव, अवयव किंवा शरीरातील अन्य द्रव पदार्थांसोबतच या पदार्थांच्या संपर्कात आलेल्या वस्तू जसे की कपडे , अंथरून पांघरून इत्यादीच्या थेट संपर्कात आल्याने हा व्हायरस पसरतो. अंतिम संस्कारांदर्मयान मृतांच्या संपर्कात आल्याने देखील मारबर्क व्हायरस पसरू शकतो.मारबर्ग व्हायरल कुठून आला याबद्दल सांगायचे झाल्यास, कथितरित्या याचा नैसर्गीक स्त्रोत हा आफ्रीकन फ्रूट वटवाघूळ आहे जो रोग पसरवणाऱ्या विषाणूचा प्रसार करते पण स्वतः त्यामुळे आजारी पडत नाही.या व्हायरसते नाव मारबर्ग हे जर्मनीमधील एक शहर मारबर्गच्या नावावर ठेवण्यात आले आहे. येथे पहिल्यांदा १९६७ मध्ये एका प्रयोगशाळेत याचा शोध लागला, येथे युगांडाहून आलेले काही कामगार संक्रमित माकडांच्या संपर्कात आले होते.

मृत्यूदर किती आहे?

डब्लुएचने दिलेल्या माहितीनुसार व्हायरसच्या स्ट्रेनमुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर मागील महामारीदरम्यान २४ ते ८८ टक्क्यांपर्यंत राहीला आहे. तसेच सध्या तरी यावर लस किंवा अँटीव्हायरल इलाज नाहीये. सध्या या व्हायरसच्या इलाजासाठी वॅक्सीनवर संशोधन सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने