चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरला; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया देत भाजपचा समाचार घेतला.लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.



या कारवाईनंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. ही हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात असून सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. आता लढाईला दिशा द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

काय आहे प्रकरण?

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने