'आज फिर जिने की...'अजयच्या 'अॅक्शनचा रोमान्स'! भोलामधील 'हे' गाणं भलतचं कडक

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचे चाहते त्याच्या आगामी भोला या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तामिळ हिट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.या चित्रपटात अजयसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव हे कलाकारही असणार आहेत. हा चित्रपट ३० मार्चला येणार आहे.बुधवारी, भोलाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे भोळा चित्रपटाचं टायटल ट्रक रिलिज केलं. अजय देवगणचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचे नवीन गाणे दिल है भोला आज समोर आलं. जे पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या मनाला भिडलं आहे. 



अजय देवगणचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचे नवीन गाणे दिल है भोला आज रिलीज झाले आहे. या गाण्यात भोलाच्या प्रेमकथेसोबतच जबरदस्त अॅक्शनही दाखवण्यात आली आहे.हे गाणे अमित मिश्राने गायले असून इर्शाद कामिल यांनी हे गाणे लिहिले आहे. भोलाचे दिग्दर्शन अजय देवगणनेच केले असून तो स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अजयचा लूक हे चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण आहे. तुफानी अॅक्शन आणि त्याला मसाला मनोरंजनचाही सामावेश भोलाचा ट्रेलर दिसत आहे.'भोला'च्या रिलीजपुर्वीच या चित्रपटाची क्रेझ दिसत आहे. बॉक्स ऑफिस वेबसाइटच्या एका अहवालानुसार, भोलाने अॅडव्हान्स बुकिंगमधून तीन दिवसांत सुमारे 1 कोटींची बंपर कमाई केली आहे.रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला' या चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने